ध्वनि प्रदूषण...

ध्वनि प्रदूषण


आरडाओरड म्‍हणजे नको असलेले आवाज. ध्‍वनि प्रदूषण हा हवा प्रदूषणाचा एक महत्त्वपूर्ण घटक असल्‍याचे आकलन आता जास्‍त चांगल्‍या प्रकारे झालेले आहे.
ध्‍वनि हा हवेच्‍या माध्‍यमाने प्रवास करतो आणि म्हणूनच ह्याचे मापन हवेच्या व्‍यापक गुणवत्ता पातळीमध्‍ये केले जाते. ध्‍वनिचे मापन डेसिबलमध्‍ये करतात. 90 डेसिबलपेक्षा जास्‍त जोराच्या आवाजामुळे बधिरत्‍व (बहिरेपण) येते किंवा शरीराच्‍या नाडीतंत्रात कायमस्वरूपी बदल होऊ शकतात असे तज्ञांचे म्‍हणणे आहे. वर्ल्‍ड हेल्‍थ ऑर्गनायझेशन (WHO) ने शहरासाठी ध्‍वनि स्‍तराचे सुरक्षित मापन 45 डेसिबल असल्‍याचे निश्चित केलेले आहे. भारतातील महानगरी क्षेत्रांमध्‍ये बहुतेक 90 डेसिबलपेक्षा जास्‍त ध्‍वनिपातळीची नोंद केली जात आहे; मुंबई हे जगातील तिसर्‍या क्रमांकाचे ध्‍वनिप्रदूषित शहर आहे, आणि अशाच प्रकारचे ध्‍वनिप्रदूषण स्‍तर दिल्‍लीचे ही आहे.
आवाज किंवा ध्‍वनिमुळे फक्‍त चि‍डचिड किंवा रागच येत नाही तर ह्यामुळे रक्‍तवाहिन्‍या संकुचित होतात, आणि ऍन्‍ड्रॅलिनचा प्रवाह वाढतो. ह्यामुळे ह्रदयाच्‍या कार्याची गति वाढते. सतत येत असलेल्‍या आवाजामुळे शरीरातील कोलेस्‍ट्रॉलची पातळी वाढते ज्‍यामुळे रक्‍तवाहिन्‍या कायमच्‍या संकुचित होऊन ह्रदयाघात आणि हार्ट स्‍ट्रोकचा धोका फार प्रमाणात वाढतो. प्रमाणापेक्षा जास्‍त ध्‍वनि किंवा आवाजामुळे न्‍यूरोसिस आणि नर्व्‍हस ब्रेक डाउनदेखील होतो असे तज्ञांचे मत आहे.

-सर्जेराव  संभाजी जोगदंड.

Comments

Popular posts from this blog

पाणी ज्वलंत समस्या

कचरा...