कचरा...

कचरा...

     निसर्गात कोणताच कचरा नसतो.  कचरा हा आपणच करतो.  निसर्गापासून जे आपल्यला मिळतं ते आपण निसर्गाला परत द्यावं असंच अपेक्षित असतं.  झाडांचेच उदाहरण द्यायचे झाले तर झाड आपल्याला पाने, फुलं, फळं देतं.  आपण ते खाऊन उरलेला भाग त्या झाडालाच योग्य माध्यमातूनं परत करायला हवा.  ज्या स्वरुपात निसर्गाला द्यायला हव म्हणजे खताच्या रुपानं झाडाला द्यायला हवं.
      पण तसं आपल्या हातून घडत नाही.  आपण हे सगळं वापर करून उरलेला नैसर्गिक कचरा इथं  तिथं फेकून देतो, थोडीफार विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात येतो, पण त्या कचऱ्याचा काही उपयोग अगर वापर करून घेता येईल का याचा विचार न करता विल्हेवाट लावली जाते.  निसर्गाला परत करत नही.  त्याच्यावर उत्तन उपाय म्हणजे आपण जो कचरा करतो तो आपणच केलाय याची भावना आणि प्रत्यक्ष कार्यवाही प्रत्येकानं ठेवली तर कचर्याचा प्रश्नच राहणार नाही.

-सर्जेराव  संभाजी जोगदंड.

Comments

Popular posts from this blog

पाणी ज्वलंत समस्या

ध्वनि प्रदूषण...