Posts

Showing posts from November, 2018

अशी साजरी करा कोजागिरी पौर्णिमा, तरच होईल फायदा!

अशी साजरी करा कोजागिरी पौर्णिमा, तरच होईल फायदा! आज कोजागिरी. वर्षाऋतू संपून आश्विन महिन्यात आकाश निरभ्र होण्यास सुरुवात होते. ह्या महिन्यातील पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ह्या रात्री श्रीलक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर येऊन “को जागर्ति? को जागर्ति ?” (म्हणजेच कोण जागे आहे) असे विचारात सर्वत्र संचार करत असते. जो जागरण करतो आहे त्याला धनसंपत्तीने समृद्ध करते अशी आख्यायिका आहे. आपले पूर्वज हे काळाच्या कितीतरी पटीने पुढे होते. आपल्या ऋषीमुनींनी हे जाणले होते की कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राची किरणे शरीर-स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. त्यामुळेच कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात सर्वांनी एकत्र येऊन त्याचा लाभ सर्वांना व्हावा ही धारणा ठेवून ह्या रात्री जो जागरण करेल तो समृद्ध होईल असे सांगण्यात आले. चंद्राच्या प्रकाशात एक प्रकारची शक्ती आहे. चंद्राच्या वाढत्या आकाराबरोबर ही शक्तीही वाढत जाते. त्यामुळेच काही वैद्य किंवा ह्या विषयातील तज्ज्ञ अमावस्येच्या दिवशी काही वनौषधींची लागवड करतात. (ह्या बद्दलचा पुरावा हवा असेल तर Gardening by the Moon, Moon Garden

वीजनिर्मितीकरिता सौर ऊर्जेला अनन्यसाधारण महत्त्व.

वीजनिर्मितीकरिता सौर ऊर्जेला अनन्यसाधारण महत्त्व.            सौर ऊर्जेला अनन्यसाधारण महत्त्व का प्राप्त होत आहे, असा जर विचार केला तर असे समजते की भारत देश विषुववृत्ताच्या जवळ आहे. सूर्य विषुववृत्तापासून उत्तरायणात उत्तरेकडे आणि दक्षिणायनात दक्षिणेकडे सरकलेला दिसतो. या काळातही सूर्याकडून येणारे किरण भारतावर पडताना लंबरूप असतात. या किरणांची कार्यक्षमता सर्वाधिक असल्याने भारत हा देश सौर ऊर्जेचा देश म्हणून ओळखला जातो. सुमारे 325 दिवस उत्तम सूर्यप्रकाश आणि उष्णता मोफत मिळत असल्याने सौर ऊर्जेच्या वापराकडे सर्व देशवासीयांनी समाजाभिमुख होऊन लक्ष द्यायला हवे. दर दिवशी सूर्याकडून 1 चौ.मी. क्षेत्रफळावर 1 किलोवॉट प्रतितास एवढी विद्युतऊर्जा मिळत असते. उदाहरणच द्यायचे म्हटले, तर या ऊर्जेत 100 वॉटचा एक दिवा 10 तास चालू शकतो, इतकी क्षमता त्यात असते.           वीजनिर्मितीकरिता, पाणी गरम करण्याकरिता, अन्न शिजवण्याकरिता, वेगवेगळे पदार्थ वाळवण्याकरिता, औद्योगिक क्षेत्रातील निरनिराळया कामांकरिता आपण या क्षेत्रफळावर पडणाऱ्या सौर ऊर्जेचा वापर करू शकतो. आजमितीला सौर ऊर्जेविषयी भारतात आशादायी वातावर

ध्वनि प्रदूषण...

ध्वनि प्रदूषण आरडाओरड म्‍हणजे नको असलेले आवाज. ध्‍वनि प्रदूषण हा हवा प्रदूषणाचा एक महत्त्वपूर्ण घटक असल्‍याचे आकलन आता जास्‍त चांगल्‍या प्रकारे झालेले आहे. ध्‍वनि हा हवेच्‍या माध्‍यमाने प्रवास करतो आणि म्हणूनच ह्याचे मापन हवेच्या व्‍यापक गुणवत्ता पातळीमध्‍ये केले जाते. ध्‍वनिचे मापन डेसिबलमध्‍ये करतात. 90 डेसिबलपेक्षा जास्‍त जोराच्या आवाजामुळे बधिरत्‍व (बहिरेपण) येते किंवा शरीराच्‍या नाडीतंत्रात कायमस्वरूपी बदल होऊ शकतात असे तज्ञांचे म्‍हणणे आहे. वर्ल्‍ड हेल्‍थ ऑर्गनायझेशन (WHO) ने शहरासाठी ध्‍वनि स्‍तराचे सुरक्षित मापन 45 डेसिबल असल्‍याचे निश्चित केलेले आहे. भारतातील महानगरी क्षेत्रांमध्‍ये बहुतेक 90 डेसिबलपेक्षा जास्‍त ध्‍वनिपातळीची नोंद केली जात आहे; मुंबई हे जगातील तिसर्‍या क्रमांकाचे ध्‍वनिप्रदूषित शहर आहे, आणि अशाच प्रकारचे ध्‍वनिप्रदूषण स्‍तर दिल्‍लीचे ही आहे. आवाज किंवा ध्‍वनिमुळे फक्‍त चि‍डचिड किंवा रागच येत नाही तर ह्यामुळे रक्‍तवाहिन्‍या संकुचित होतात, आणि ऍन्‍ड्रॅलिनचा प्रवाह वाढतो. ह्यामुळे ह्रदयाच्‍या कार्याची गति वाढते. सतत येत असलेल्‍या आवाजामुळे शरीरातील कोल

कचरा...

कचरा...      निसर्गात कोणताच कचरा नसतो.  कचरा हा आपणच करतो.  निसर्गापासून जे आपल्यला मिळतं ते आपण निसर्गाला परत द्यावं असंच अपेक्षित असतं.  झाडांचेच उदाहरण द्यायचे झाले तर झाड आपल्याला पाने, फुलं, फळं देतं.  आपण ते खाऊन उरलेला भाग त्या झाडालाच योग्य माध्यमातूनं परत करायला हवा.  ज्या स्वरुपात निसर्गाला द्यायला हव म्हणजे खताच्या रुपानं झाडाला द्यायला हवं.       पण तसं आपल्या हातून घडत नाही.  आपण हे सगळं वापर करून उरलेला नैसर्गिक कचरा इथं  तिथं फेकून देतो, थोडीफार विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात येतो, पण त्या कचऱ्याचा काही उपयोग अगर वापर करून घेता येईल का याचा विचार न करता विल्हेवाट लावली जाते.  निसर्गाला परत करत नही.  त्याच्यावर उत्तन उपाय म्हणजे आपण जो कचरा करतो तो आपणच केलाय याची भावना आणि प्रत्यक्ष कार्यवाही प्रत्येकानं ठेवली तर कचर्याचा प्रश्नच राहणार नाही. - सर्जेराव  संभाजी जोगदंड.

पाणी ज्वलंत समस्या

Image
पाणी ज्वलंत समस्या          पाणी म्हणजे जीवन अन् जीवन म्हणजे पाणी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काही दिवसांपूर्वीच आपण जागतिक जलदिन साजरा केला खरा; पण त्यातून काय बोध घेतला का हो? कडक उन्हाळ्यात कदाचित तो जागतिक जलदिन म्हणून महत्त्वाचा ठरलाही असेल, पण वर्षातील 8 महिने पाण्याची काळजी कोणाला नसते.  किंबहुना पाणी बचत, पाणी टंचाई या विषयावर बोलायलासुद्धा वेळ नसतो.        उन्हाळ्याच्या झळा लागल्या की सर्वजण खडबडून जागे होतात. तहान लागली की विहीर खोदतात. दिवसेंदिवस कमी होणारे पर्जन्यमान, पाण्याचा तुटवडा, ग्लोबल वार्मिंग, पर्यावरणातील बदल, वाढती लोकसंख्या, कमी पडणारा पाणीसाठा, पाण्याचा अपव्यय अशा बर्‍याच गोष्टींमुळे  पाणी टंचाई व दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, शेततळी बंधारे व शेतात ठिबक सिंचन योजना या गोष्टींकडे जर माणूस वळला तर पाण्याचे योग्य नियोजन होऊ शकते. त्यासाठी फक्त एकजूट, कष्टाची तयारी हवी. तरच या दुष्काळ नावाच्या शापातून कायमची मुक्ती मिळू शकते.            पूर्वी धो-धो पाऊस पडत असल्याने तुडूंब भरून वाहणारे ओढे, नद्या, नाले, बंधारे, विहिरी या