वीजनिर्मितीकरिता सौर ऊर्जेला अनन्यसाधारण महत्त्व.
वीजनिर्मितीकरिता सौर ऊर्जेला अनन्यसाधारण महत्त्व.
सौर ऊर्जेला अनन्यसाधारण महत्त्व का प्राप्त होत आहे, असा जर विचार केला तर असे समजते की भारत देश विषुववृत्ताच्या जवळ आहे. सूर्य विषुववृत्तापासून उत्तरायणात उत्तरेकडे आणि दक्षिणायनात दक्षिणेकडे सरकलेला दिसतो. या काळातही सूर्याकडून येणारे किरण भारतावर पडताना लंबरूप असतात. या किरणांची कार्यक्षमता सर्वाधिक असल्याने भारत हा देश सौर ऊर्जेचा देश म्हणून ओळखला जातो. सुमारे 325 दिवस उत्तम सूर्यप्रकाश आणि उष्णता मोफत मिळत असल्याने सौर ऊर्जेच्या वापराकडे सर्व देशवासीयांनी समाजाभिमुख होऊन लक्ष द्यायला हवे. दर दिवशी सूर्याकडून 1 चौ.मी. क्षेत्रफळावर 1 किलोवॉट प्रतितास एवढी विद्युतऊर्जा मिळत असते. उदाहरणच द्यायचे म्हटले, तर या ऊर्जेत 100 वॉटचा एक दिवा 10 तास चालू शकतो, इतकी क्षमता त्यात असते.
वीजनिर्मितीकरिता, पाणी गरम करण्याकरिता, अन्न शिजवण्याकरिता, वेगवेगळे पदार्थ वाळवण्याकरिता, औद्योगिक क्षेत्रातील निरनिराळया कामांकरिता आपण या क्षेत्रफळावर पडणाऱ्या सौर ऊर्जेचा वापर करू शकतो. आजमितीला सौर ऊर्जेविषयी भारतात आशादायी वातावरण निर्माण होत आहे. परंतु हा वेग अतिशय मंद आहे. ज्या पध्दतीने ग्लोबल वॉर्मिंगचे चटके बसू लागले आहेत, त्या तुलनेत समाजात त्या विषयीची जागरूकता, त्या विषयीच्या उपाययोजना करण्याबाबत समाजात अनास्था दिसून येत आहे.
Comments
Post a Comment