अशी साजरी करा कोजागिरी पौर्णिमा, तरच होईल फायदा!

अशी साजरी करा कोजागिरी पौर्णिमा, तरच होईल फायदा!
आज कोजागिरी. वर्षाऋतू संपून आश्विन महिन्यात आकाश निरभ्र होण्यास सुरुवात होते. ह्या महिन्यातील पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ह्या रात्री श्रीलक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर येऊन “को जागर्ति? को जागर्ति ?” (म्हणजेच कोण जागे आहे) असे विचारात सर्वत्र संचार करत असते. जो जागरण करतो आहे त्याला धनसंपत्तीने समृद्ध करते अशी आख्यायिका आहे.
आपले पूर्वज हे काळाच्या कितीतरी पटीने पुढे होते. आपल्या ऋषीमुनींनी हे जाणले होते की कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राची किरणे शरीर-स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. त्यामुळेच कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात सर्वांनी एकत्र येऊन त्याचा लाभ सर्वांना व्हावा ही धारणा ठेवून ह्या रात्री जो जागरण करेल तो समृद्ध होईल असे सांगण्यात आले. चंद्राच्या प्रकाशात एक प्रकारची शक्ती आहे. चंद्राच्या वाढत्या आकाराबरोबर ही शक्तीही वाढत जाते. त्यामुळेच काही वैद्य किंवा ह्या विषयातील तज्ज्ञ अमावस्येच्या दिवशी काही वनौषधींची लागवड करतात. (ह्या बद्दलचा पुरावा हवा असेल तर Gardening by the Moon, Moon Gardeners etc. गुगल करू शकता ) चंद्राच्या प्रकाशात असलेली शक्ती आपल्या ऋषीमुनींनी ओळखली होती. दूध हे आरोग्यदायी आहे. चंद्राच्या प्रकाशात जर दूध ठेवले आणि प्राशन केले तर ती शक्ती आपल्या शरीर स्वास्थ्यसाठी अत्यंत अमृतदायी ठरते. कोजागिरीप्रमाणेच कार्तिक महिन्यातील त्रिपुरारी पौर्णिमाही आरोग्यदायी आहे. मुंबईच्या जवळच अंबरनाथ इथे महादेवाचे मंदिर आहे. ह्या मंदिराच्या आसपासच्या परिसरात मोठे मैदान आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला ह्या मैदानातच सर्वजण उपस्थित असतात. स्वतःच्या समोर एका चिनीमातीच्या बशीत दुध ठेवले जाते. ते दुध रात्री काही काळांनंतर प्राशन केले जाते. हे सर्व सांगण्याचा उद्देश असा की पौर्णिमेच्या दिवशीच ही सर्व शक्ती वातावरणात असते आणि जसा चंद्राचा क्षय होतो तशी ही शक्तीही कमी कमी होत जाते.

Comments

  1. A new casino may be offered in Nevada after - JDK
    The 전라북도 출장샵 MGM National Harbor and the 영주 출장안마 Seminole 동두천 출장마사지 Casino in Fort Lauderdale, Florida, were approved Monday by the 거제 출장샵 Nevada Gaming Control Board to 춘천 출장안마

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पाणी ज्वलंत समस्या

कचरा...

ध्वनि प्रदूषण...